काश्मिरात परतली थंडीची लाट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
श्रीनगर :
 
 
 
संपूर्ण काश्मीर खोर्‍यात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीची लाट परत आली असून, शुक‘वारी रात्री बहुतांश भागांमधील तापमान शून्यापेक्षाही खाली गेले होते. त्यातच सलग दोन दिवस झालेल्या बर्फवृष्टीमुळे सामान्य जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अनेक मार्गांवर अजूनही बर्फ साचला असल्याने वाहतूकही प्रभावित झाली आहे. श्रीनगरात शुक‘वारी उणे 5.7 अंश तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या रात्री या शहरात उणे 1 असे तापमान होते. उत्तर काश्मिरातील स्कि-रिसोर्ट असलेल्या गुलमर्ग येथे उणे 14.4, काश्मीर खोर्‍याचे प्रवेशद्वार असलेल्या काझिगुंड येथे उणे 9 इतक्या कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.