कुंभात आज तिसरे शाही स्नान; दोन कोटी भाविक येण्याची शक्यता
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
प्रयागराज,
 
 
उद्या रविवारी आलेल्या वसंत पंचमीच्या अनुषंगाने प्रयागराज येथील कुंभमेळ्यात तिसर्‍या शाही स्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात देश-विदेशातून सुमारे दोन कोटी भाविक पवित्र संमगात डुबडी घेण्याची शक्यता आहे.
 
उद्याच्या तिसर्‍या शाही स्नानात सहभागी होण्यासाठी आज सकाळपासूनच देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांचे आगमन सुरू सुरू झाले असून, गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगमावर तात्पुरती वसविण्यात आलेली कुंभनगरी भाविकांनी फुललेली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहेत, अशी माहिती कुंभ मेळ्याचे अधिकारी विजय किरण आनंद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
 
अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद‘ गिरी म्हणाले की, 15 जानेवारी रोजी सुरू झालेल्या कुंभमेळ्याच्या काळात तीन शाही स्नान आणि तीन पर्वस्नानांचा योग आला आहे. 4 मार्च रोजी आलेल्या महाशिवरात्रीला कुंभमेळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी शेवटचे शाही स्नान आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी मकरसंक‘ाती आणि मौनी अमावस्येच्या दिवशी पहिले आणि दुसरे शाही स्नान पार पडले होते.