मुझफ्फरनगर कवाल हत्याकांड प्रकरणात सातही आरोपींना जन्मठेप
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुझफ्फरनगर :
 
 
 
मुझफ्फरनगरमध्ये दोन भावांच्या हत्याप्रकरणात सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनविण्यात आली आहे. बुधवारी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले होते. या प्रकरणी मुजम्मिल, मुजस्सिम, फुरकान, नदीम, जहांगीर, अफजल आणि इक्बाल या सातजणांना दोषी ठरविण्यात आले. 
 
सचिन आणि गौरव यांची हत्या झाल्यानंतर कवाल गावामध्ये दंगल उसळली होती.  27 ऑगस्ट 2013 मध्ये हे प्रकरण घडले होते. यावेळी झालेल्या दंगलीमध्ये मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये 60 जण ठार झाले होते.
 2013 मध्ये सचिन आणि गौरव यांच्याशी आरोपींचा मोटारसायकल अपघातावरून वाद झाला होता. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी भडकलेल्या दंग्यामध्ये आरोपींपैकी शाहनवाज याचाही मृत्यू झाला होता, असे सरकारी वकील कुमार त्यागी यांनी सांगितले.