शारदा चिटफ़ंड घोटाळा; सीबीआयकडून पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआयकडून शिलाँग येथे चौकशी सुरु आहे. राजीव कुमार आणि सीबीआय अधिकारी शिलाँग येथील मुख्यालयात दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार चौकशी करण्यासाठी शिलाँगची निवड करण्यात आली आहे.
 
 
सरस्वती पूजा उद्या तर बोर्डाच्या परिक्षा १२ फेब्रुवारीपासून असल्यामुळे पोलीस बंदोबस्ताबाबत निर्णय घ्यायचे असल्याने आपल्याला फार वेळ शिलाँगमध्ये थांबता येणार नाही असे राजीव कुमार यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना सांगितले. 
 
 
राजीव कुमार यांच्यासोबत राज्यातील तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी शुक्रवारीच शिलाँग येथे पोहोचले. चिटफंड घोटाळा प्रकरणात राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयने दहाजणांचे पथक बनवले आहे. रविवारी सीबीआय अधिकारी चौकशीसाठी थेट राजीव कुमार यांच्या निवासस्थानी धडकल्यानंतर स्थानिक पोलीस आणि सीबीआयमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती.