सीताबर्डी परिसरात अतिक्रमणाची कारवाई पुन्हा सुरु; ४२ अवैध दुकानांना मिळाली होती नोटीस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
सीताबर्डी परिसरातील उर्वरित १२ दुकानांना आपले सामान आवरण्यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत आज संपली. 
 
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीताबर्डी परिसरातील अवैध ३३ दुकाने पाडण्याची मोहीम नागपूर सुधार प्रन्यासकडून ५ फेब्रुवारी रोजी राबविण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अवैध ताबा हटवा, अशी नोटीस सीताबर्डी परिसरातील ४२ दुकानदारांना देण्यात आली होती.
 
 
 
 
 
 
 
सीताबर्डीतील मुंजे चौक परिसरातील मोक्याच्या जागेवर असेलेल्या या दुकानांपैकी २१ दुकाने मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आली.
 
 
 
 

 
 
 
 
सीताबर्डीच्या परिसरात असलेल्या ४२ अवैध दुकानदारांना नोटीस पाठविण्यात आली होती. यात बॉम्बेवाला, जैम फ्रेमिंग, पांडे सन्स, गेसन्स, व्हिक्टर वॉच, एस. रामचंद्र, सोना सन्स, चाफेकर दुग्ध मंदिर, हमलोग बाजार, सुपर चॉइस बाजार, रजत ऑप्टिकल, अनुपम ज्वेलरी, नावेल्टी बॅग, राठी ड्रेस स्टाइल, बालाजी मोबाइल, ओम साई हॅण्डलूम, सिमरण बुटी, बाटा शूज, सिलेक्शन हाउस, क्वालिटी फॅशन आदी दुकानांचा समावेश आहे.