टि्‌वटरच्या अधिकार्‍यांचा संसदीय समितीपुढे येण्यास नकार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :09-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली, 
 
 
सोशल मीडियावरील नागरिकांचे हक्क अबाधित राखण्याच्या मुद्यावर माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय समितीने समन्स बजावल्यानंतरही टि्‌वटरचे मु‘य कार्यकारी अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी या समितीपुढे हजर होण्याचे टाळले आहे, अशी माहिती समितीने आज शनिवारी दिली.
 
 
भाजपाचे खासदार अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने गेल्या 1 फेबु‘वारी रोजी टि्‌वटरच्या सीईओ आणि अधिकार्‍यांना लेखी समन्स जारी केला होता. 7 फेबु‘वारी रोजी या अधिकार्‍यांना समितीपुढे हजर व्हायचे होते, पण एकही अधिकारी आला नाही. त्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून, ती आता 11 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
 
 
या बैठकीला टि्‌वटरच्या अधिकार्‍यांना उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे समितीच्या सूत्रांनी सांगितले.
इतक्या अल्प मुदतीच्या नोटीसवर समितीपुढे हजर होणे आम्हाला शक्य नव्हते, असे कारण टि्‌वटरने दिले आहे. तर, समितीच्या सूत्रांच्या मते, सात दिवसांची नोटीस पुरेशी होती, पण टि्‌वटरच्या अधिकार्‍यांनी मुद्दामच टाळाटाळ केली.