कारंजात उद्यापासून राज्यस्तरीय बालगट खंजरी भजन स्पर्धा
   दिनांक :01-Mar-2019
-४० हजारांची १० बक्षिसे
 
 
 
कारंजा घाडगे, 
महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गुरूदेव अमृतगिरी महाराज बाल भजन मंडळ व गुरूदेव सांस्कृतिक कला क्रीडा भजन मंडळ कारंजा घाडगे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बालगट खंजीरी भंजन स्पर्धेचे आयोजन २ व ३ मार्चला करण्यात येत आहे. येथील जयस्तंभ चौक परिसरात आयोजित भजन स्पर्धेचे उदघाटन आमदार अमर काळे यांचे हस्ते करण्यात येईल.
 
याप्रसंगी नगराध्यक्षा कल्पना मस्की, माजी नगराध्यक्षा बेबीताई कठाणे, उपनगराध्यक्ष नितीन दर्यापूरकर, बांधकाम सभापती नरेश चाफले, गुरूदेव प्रचारक अजय गंध्रे,निलेश इंगळे,शशि भूषण कामडी सरपंच वाघोडा,सतीश इंगळे,प्रमोद चव्हाण,बाबा बारई ,संदिप गाखरे,सितेश्वर भादे,रविकांत गाडरे,गोपाल विरूळकर, कावळे महाराज इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट गायक, खंजरी वादक, तबला वादक आणि हार्मोनिअम वादक यांना एकूण दहा पुरस्कारासाठी ४० हजारांची बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे.
 
याप्रसंगी सुशांत घाटोळकर तबलावादनाचा सोलो कार्यक्रम सादर करणार आहे. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.