ट्रकने दूचाकिस्वारास चिरडले
   दिनांक :01-Mar-2019
मालेगाव
नागपूर - औरंगाबाद महामार्गावरील मालेगाव शहरापासून काही अंतरावर डव्हा फाटयाजवळ आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान भरधाव ट्रकने दूचाकिला जबर धडक दिली. या अपघातात दूचाकिस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
 
 
 
डव्हा फाटयावरून दूचाकि क्रंमाक एम. एच. ३७ एफ-५७७९ या दूचाकीने राजू चव्हाण हे खिर्डा गावाकडे जात होते, त्यांना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दूचाकीसह ते ट्रकच्या चाकाखाली आले. यामध्ये राजू चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहीती जऊळका पोलीसांनी दिली.
 
पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे. याआधी १५ दिवसांपूर्वी या मार्गावर गंभीर अपघात घडला होता, त्यात माय लेकाचा दूर्देवी मृत्यू झाला होता.