रेती खाली दबून मजुर ठार; एक जखमी
   दिनांक :01-Mar-2019
अकोला,
शेगाव नजीक लोहारा येथून चोहट्टा येथे रेतीची वाहतूक करणारे 407 वाहन उलटून त्यातील एक मजूर ठार तर एक जखमी झाला आहे.
 
जिल्ह्यातील उरळ पोलीस स्थानका अंतर्गत येणाऱ्या लोहारा येथून चोहट्टा बाजार येथे रेती नेणारे 407 वाहन कारंजा रमजानपूर जवळ उलटले या वाहनावर बसलेला मजूर जितू रायबोले याचा रेती खाली दबून मुत्यु झाला तर एक मजूर जखमी असल्याचे कळते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.