पहिल्यांदाच अमेरिका खेळणार आंतरराष्ट्रीय T 20
   दिनांक :01-Mar-2019
 
१४ खेळाडूंचा संघ जाहीर 
 
आज घडीला संपूर्ण देशात जरी क्रिकेट प्रेमी असले तरी अमेरिका मात्र याला अपवाद आहे; पण आता मात्र जगातील 'सुपर पॉवर' असलेला हा देश लवकरच क्रिकेटच्या मैदानात आपली टीम उतरविणार आहे. अमेरिकेने यासाठी पहिल्यांदाच १४ जणांची  आंतरराष्ट्रीय T 20 तयार केली आहे. 
 

 
 
अमेरिका संयुक्त अरब अमीरातविरुद्ध आपली पहिली टी -20 मालिका खेळणार आहे, ही मालिका १५ मार्च पासून सुरू होणार आहे. दुबई मध्ये ही मालिका पार पडणार असून त्यासाठी दोन्ही संघ लवकरच दुबईला रवाना होतील. या मालिकेद्वारे आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग डिव्हिजन २ ची तयारी सुरू करण्यासाठी अमेरिकेच्या संघाला एक चांगली संधी मिळणार आहे. एप्रिल महिन्यात नामिबिया येथे आयसीसीच्या दुसऱ्या स्तरावर होणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अमेरिका संघ तयारी करत आहे.