विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज सुटका
   दिनांक :01-Mar-2019
इस्लामाबाद :
 
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून, अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका केली जाईल, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी दुपारी पाकिस्तानी संसदेत केली. इम्रान खान यांची ही घोषणा म्हणजे भारतापुढे पत्करलेली शरणागती असल्याचे मानले जात असून, भारताचा तसेच आंतरराष्ट्रीय दबाव यांमुळेच पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांची सुटका होणार असल्याच्या वृत्ताने भारतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
 
 अभिनंदन यांना आज लाहोरला नेण्यात येणार असून, तेथून पंजाबमधील वाघा बॉर्डरवर आणले जाईल. तेथे त्यांचा ताबा भारताकडे देण्यात येईल. इम्रान खान म्हणाले की, भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची सुटका करणार आहोत.