कुपवाडा जिल्ह्यात भारतीय सैन्यकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
   दिनांक :01-Mar-2019
श्रीनगर 
 पाकिस्तानी रेंजर्संने सीमारेषेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यास, भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे . उपचारासाठी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, कुपवाडा येथे सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

 
 
कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांचीही चमकमक झाली असून जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. शुक्रवारी सकाळीच सीमाभागात दहशतवादी घुसल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर, सुरक्षा जवानांनी शोधमोहिम राबवून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पुलवामा हल्ल्यानंतर सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) रोजीही सकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळीही भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. दरम्यान, सीमेजवळील सर्व गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.