पालघर भूकंपाचे हादरे गुजरात सीमेपर्यंत
   दिनांक :01-Mar-2019
पालघर
मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आज सकाळी पुन्हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. आजपर्यंतच्या भूकंपांपेक्षा हा धक्का मोठा होता. ठाण्यातदेखील भूकंपाचे हादरे जाणवल्याची तक्रार ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आली.
 
 
सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा पहिला धक्का बसला. पालघर जिल्ह्यातील वडराईपासून ते बोइसर औद्योगिक वसाहत व अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी देखील याचे हादरे जाणवले. त्याशिवाय गुजरात सीमेवरील उंबरगावपर्यंत धक्क्यांची तीव्रता जाणवली. भूकंपाच्या या धक्क्यांमुळं डहाणू व तलासरी तालुक्यातील अनेक घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. रेल्वे रुळांवर याचा काही परिणामा झाला आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.