बाबूभैय्या,राजू, श्यामचे त्रिकूट परतणार
   दिनांक :01-Mar-2019
 
 
 
'ये बाबूराव का स्टाइल है' म्हणत प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी बाबूभाई, राजू आणि श्याम हे त्रिकूट पुन्हा सज्ज होणार आहे. 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी'नंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग येणार आहे. 'हेरा फेरी ३' बनणार अशा चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू होत्या मात्र त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु, एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी 'हेरा फेरी ३' च्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचे जाहीर केलं. 'हेरा फेरी ३ च्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे. या वर्षाच्या शेवटी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. मी 'टोटल धमाल' चित्रपटाच्या तयारीत व्यग्र होतो. त्यामुळे मला पुरेसा वेळ देता आला नाही. परंतु, आता मी 'हेरा फेरी ३' च्या तयारीला लागणार आहे. ' असं ते म्हणाले. 'हेरा फेरी ३' मध्ये अभिनेते परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.