अभिनंदन परतले मायभूमीत
   दिनांक :01-Mar-2019
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान भारतात दाखल झाले आहेत. पाकिस्तानने कागदोपत्री प्रकिया पूर्ण करुन शुक्रवारी संध्याकाळी अभिनंदन यांना भारताकडे सोपवले. अटारी-वाघा बॉर्डरमागे अभिनंदन यांना भारताकडे सोपवले. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचे आगमन होणार असल्याने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळा रद्द करण्यात आला.

 
 
अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली . संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचे सांगितले. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती होती. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठविण्यात यावे अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.