पाकिस्तानवर इस्रोचा तिसरा डोळा
   दिनांक :01-Mar-2019
सर्व संवेदनशील माहिती होणार गोळा 
 
नवी दिल्ली,
भारताची अवकाश संशोधन संस्था (इस्रो) देशाच्या सामरिक दृष्टीनेही महत्त्वाची आहे. इस्रोचे उपग्रह पाकिस्तानच्या ८७ टक्के भागावर नजर ठेवून आहेत. पाकिस्तानच्या प्रत्येक भागाची हाय डेफिनेशन दर्जाचे मॅिंपग इस्रो करू शकते. बालाकोट हवाई हल्ल्यासारख्या मोहिमेध्येही इस्रोने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भारतीय उपग्रह पाकिस्तानच्या जवळपास ८.८ लाख वर्ग किलोमीटर भूभागापैकी ७.७ लाख वर्ग किलोमीटर भागावर नजर ठेवण्यास सक्षम आहेत. पाकिस्तानच्या भूभागाचे भारतीय लष्कराला ०.६५  मीटरपर्यंतचे एचडी फोटो मिळत असतात. भारताची ही क्षमता दुसर्‍या शेजारी देशांसाठीही फायदेशीर आहे. आपले उपग्रह १४  देशांतील जवळपास ५५ लाख वर्ग किलोमीटर भागावर नजर ठेवू शकते. परंतु, चीनसंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध नाही.
 
 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, हे फोटो कार्टोसेट उपग्रहाने घेतले जाते. भारत पाकिस्तानच्या घरांमध्ये डोकावू शकतो आणि हा चेष्टेचा विषय नाही, असे भारताचे अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्रिंसह यांनी १७ जानेवारीला सांगितले होते. भारताची एकीकृत सीमा व्यवस्थापन यंत्रणा पाकिस्तानमधली छायाचित्र टिपण्यासाठी सक्षम आहे. इस्रोच्या कामगिरीवर भारतीय वायुदलही खूश आहे. आमची उपग्रह ७० टक्के गरज आधीच पूर्ण झाली आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत, असे एका एअर मार्शलने गेल्या आठवड्यात सांगितले होते. जे मोठे उपग्रह सुरक्षा दलाचे सहाय्यक आहेत, त्यामध्ये कार्टोसेट मालिकेतील उपग्रह , जीसॅट-७ आणि ७ ए, आयआरएनएसएस, मायक्रोसॅट, रिसॅट आणि हायसिसचा समावेश आहे. सैन्याने १० पेक्षा जास्त क्रियान्वित  उपग्रहांचा वापर केला आहे. कार्टोसेट पहिला मोठा वापर सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेवर सर्जिकल स्ट्राइकसाठी केला गेला होता.