१९ गोवंशाला जीवनदान; पोलिसांची धाडसी कारवाई
   दिनांक :01-Mar-2019
अकोला,
रामदास पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कागजी पुरा भागात कत्तलीसाठी गोवंश असल्याची माहिती एलसीबी पथकाला गुप्त महितीदाराने दिली. याआधारे रात्री उशिरा कारवाई करून पोलिसांनी १९ गोवंशाला जीवनदान दिले. कारवाई सुरू असताना येथे मोठा जमाव जमल्याने तणाव होता.
  
 
एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे यांना गुप्त माहिती मिळाली की,कागजी पुरा भागात मोठया प्रमाणात कत्तलीसाठी गोवंश आणला आहे. त्या आधारे वरिष्ठांना अवगत करून कारवाईसाठी एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहचले असता या ठिकाणी घरांसमोर गोवंश बांधून ठेवलेला दिसला. याबाबत परिसरात विचारणा केली असता कुणीही या गोवंशाची मालकी सांगण्यास पुढे आले नाही.
 
यावरून हा गोवंश कत्तलीसाठी आणला होता ही खात्री पटल्याने पोलिसांनी येथील १९ गोवंश त्याब्यात घेऊन येथील आदर्श गो अनुसंधान प्रकल्पात संगोपणार्थ पाठविले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.कारवाई सहा पुलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, शक्ति कांबले, प्रमोद डोईफोड़े, भाऊलाल हेबाडे , संदीप काटकर, फिरोज खान उर्फ बल्ली यांनी केली.