आजचे राशी भविष्य, दिनांक १ मार्च २०१९
   दिनांक :01-Mar-2019
 • मेष : चांगल्या कामाला आजचा दिवस चांगला आहे. शुभफलदायी असा दिवस आहे. नवी पुस्तके भेट म्हणून येतील. विवाह जुळण्यास काहीच हरकत नाही. कुणालाही काहीही शब्द देवू नका. रोखीने व्यवहार टाळा. लक्ष्मीपूजा करा.
 • वृषभ : गुंतवणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. स्थावराचे व्यवहार लाभकारक आहेत. पैशांची अडचण जाणार नाही. कुणाची तरी अचानक मदत मिळेल. शब्दांत मात्र अडकू नका. महोदवाची आराधना करा.
 • मिथुन : घरांत परीक्षार्थी असतील तर तणाव निर्माण होऊ देवू नका. खाण्या-पिण्यावर नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कुणालाही टाकून बोलू नका. आनंदावर विरजण पडेल. गणेशाची पूजा मंगलमय आहे.
 • कर्क : तुमचा व्यवसाय असेल तर आज नवे काम प्रारंभ करा. नव्या वास्तूत प्रवेशासाठी आजचा दिवस अत्यंत योग्य असाच आहे. घरची ज्येष्ठ मंडळी अचानक भेट देतील. नवे प्रश्न निर्माण होतील. केलेल्या कामाचे यथोचित फळ पदरी पडेल. मंदिरात जावून ध्यान करा.
 • सिंह : नवे काही सुरू करण्याचा विचार असेल तर आज ते करू नका. हिशेब नीट ठेवा. रस्त्याने जाताना सावध असा. वाहने जपून चालवा. कुणाच्याही फंदात पडू नका. गुंवणूक करायची असेल तर बिनधास्त करा. गणेशाला दुर्वांचा हार वहा.
 • कन्या : तुमच्या मार्गाने तुम्ही जाल. कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल पण त्याचा हेतू सफल होणार नाही. गुरुचे ध्यान करा. वाहन खरेदीचे विचार मनांत येतील; मात्र आज ती टाळा. कुणाला काही देणे असेल तर आज देवू नका. कुलदैवताची आराधना करा.
 • तूळ : गेल्या अनेक दिवसांपासून मनांत असलेले धाडस आज बिनदिक्कत करा. महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. कुणाला कसलाच शब्द देवू नका. जोडीदाराला खूष ठेवा. नवे वस्त्र खरेद कराल. गावदेवीच्या मंदिरात दान करा.
 • वृश्चिक : कारखानदारीत असणार्‍यांना आजचा दिवस लाभकारक आहे. नोकरदार वर्गाची साथ मिळेल. घरांत शिकणारी मुलं असतील तर त्यांना नीट सांभाळा. जोडीदाराच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पैशाचे व्यवहार स्वत: करू नका. दत्तात्रयाचे स्तोत्र म्हणा.
 • धनू : कुणी काहीही सांगितले तर ते नीट तपासूनच निर्णय घ्या. ऐकावे जनाचे अन्‌ करावे मनाचे हे सुत्र ध्यानात असू द्या. स्थावराच्या व्यवहारात तुम्हाला लाभ आहे. अनेकांच्या मनात तुमच्याविषयी आस्था आहे, याची जाणीव होईल. अध्यात्मिक वाचन करा.
 • मकर : आज प्रकृतीकडे दुर्लक्ष अजिबातच करू नका. कफाचे विकार असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यायची आहे. नाका समोर पाहून चला. कुणाच्या फंदात पडू नका. बांधकाम काढायचे असेल तर आजचा दिवस त्यासाठी उत्तम आहे. सरस्वती मातेची आराधना करा.
 • कुंभ : गेल्या काही दिवसांपासून असलेली अस्थिरता आज संपेल. परस्त्री प्रेमात पडेल. मात्र त्यापासून धोका नाही. कुटुंबात कलह होणार नाही. लेखनाच्या क्षेत्रांत असलेल्या मंडळींना आज नावलौकि मिळेल. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. तपकिरी रंग आज तुम्हाला लाभदायी आहे.
 • मीन : आज तुमचा दिवस आहे. घरी आणि कामाच्या ठिकाणीही तुमचे महत्त्व सार्‍यांनाच कळणार आहे. हवे ते अधिकार आणि पगारवाढ किंवा इन्सेटिव्हज्‌ मिळतील. ज्यांच्या हाती अधिकाराची पदे आहेत त्यांनी निर्णय घेताना सावध असणे गरजेचे आहे. मारोतीची उपासना फलदायी आहे.