अमेरिकेने ठेवले लादेनच्या मुलावर बक्षीस
   दिनांक :01-Mar-2019
ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खात्मा केला मात्र त्याचा मुलगा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हामजा याने आता ओसामाची जागा घेतली आहे. ओसामा बिन लादेनच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हामजा कट रचतो आहे, त्याने अमेरिकेविरोधात काही दहशतवादी कारवाई करण्याआधीच तो अमेरिकेला हवा आहे. त्याचमुळे १ दशलक्ष डॉलरचा इनाम अमेरिकेने जाहीर केले आहे. हामजाला जिहादींचा राजा असे संबोधले जाते.
 
 
गेल्या काही दिवसांपासून अल कायदा ही दहशतवादी संघटना शांत आहे, मात्र ते आत्मसमर्पण नाही. आम्हाला याबाबत कोणतीही चूक करायची नाही. अल कायदा या दहशतवादी संघटनेकडे हल्ला करण्याची क्षमता आणि कारण या दोन्ही गोष्टी आहेत, त्यामुळे आम्हाला हामजाने काही कारवाई करण्याआधी तो हवा आहे असे अमेरिकेतले अधिकारी नॉथन सेल्स यांनी म्हटले आहे.