इथिओपियन एअरलाईन्सचे विमान कोसळले
   दिनांक :10-Mar-2019
  
 
आदीस,
इथिओपियन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ आदीसवरून नैरोबीला जात असताना कोसळले. विमानामध्ये एकुण १४९ प्रवासी, तर ८ क्रु मेंबर आहेत. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
 
 
 
 
इथिओपियाच्या पंतप्रधानांनी ट्विटरवरून विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. इथिओपियन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ हे विमान आदीसवरून केनियाची राजधानी नैरोबीला चालले होते. दरम्यान, एअरलाईन्सकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.