चौथ्या वन-डे सामन्यात भारत पराभूत
   दिनांक :10-Mar-2019
 
 मोहाली : ऑस्ट्रेलियाने चौथ्या वन-डे सामन्यात ४ गडी राखून भारताचा पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधल्याने मालिकेतील आव्हान कायम ठेवले आहे. शिखर धवनची शकती खेळी व्यर्थ ठरली. १९९७ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारताचा मोहालीतील मैदानावर पराभव केला.  पीटर हॅंड्सकॉम्बचे शतक (११७), ख्वाजाची संयमी खेळी (९१) आणि टर्नरची तुफानी ८४ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचे आव्हान २ षटके राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली.