आजचे राशी भविष्य, दि. १० मार्च २०१९
   दिनांक :10-Mar-2019
 
मेष-  अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील.
 
वृषभ - प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. कायदा पाळा. बोलतांना मागचा पुढचा विचार करा. 
 
मिथुन - निष्काळजीपणामुळे तोटा संभवतो. एकाग्र चित्तेने निर्णय घ्या. कौटुंबिक सुख लाभेल.  
 
कर्क - भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या.
 
सिंह - आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका.
 
कन्या -  बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुमचे प्रयत्न आणि झोकून देऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे तुमच्या कुटुंबातील लोक तुमचे कौतुक करतील.
 
तूळ - अनेक चिंतांनी ग्रासल्यमुळे तुमची प्रतिकारक्षमता घटेल आणि विचारशक्ती कुंठेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वत:ला उत्तेजन द्या.
 
वृश्चिक - आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.
 
धनु - मच्या आजाराबद्दल चर्चा करणे टाळा. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार, म्हणून इतर दुस-या कामामध्ये स्वत:ला गुंतविणे श्रेयस्कर.
 
मकर -  दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते.
 
कुंभ - आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा.
 
मीन - नवीन काम सुरु करण्यासाठी चांगला दिवस. निर्णय घेतांना वास्तविकता तपासून पाहा.