'गली बॉय'चा सिक्वल येणार
   दिनांक :10-Mar-2019
झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि रॅपर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपडणाऱ्या डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दिग्दर्शिका झोया अख्तरने ‘गली बॉय’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आणली. अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर तुफान प्रतिसाद मिळाला. आता या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वलसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द झोया अख्तरने याविषयीची माहिती दिली आहे.

 
‘आपल्या देशातल्या हिप-हॉप संस्कृतीबद्दल अजून खूप काही सांगण्यासारखे आहे असे मला आणि माझी सहलेखिका रीमा कागदीला वाटते. त्यामुळे यावर आणखी सविस्तरपणे भाष्य करणारे चित्रपट आम्ही तुमच्या भेटीला आणू. त्याची कथा काय असेल यावर सध्या काम सुरू आहे,’ असे झोयाने सांगितले.