ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत अमरावतीत जनजागृती कार्यशाळा
   दिनांक :10-Mar-2019
अमरावती : राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांसाठी आज अमरावतीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती दिली. या यंत्रणेचा इंटरनेटशी कुठलाही संबंध नसल्याने ईव्हीएम हॅक होते, अशा आरोपात तथ्य नसल्याचेही शरद पाटील यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही शरद पाटील म्हणाले. यावेळी उपस्थितांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेवर चाचणी मतदान करून मतदान यंत्रणेची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.