मेक्सिकोतील नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार; १५ जणांचा मृत्य, ४ जखमी
   दिनांक :10-Mar-2019
मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 
पब्लिक प्रोसिक्यूटर्स कार्यालयाचे प्रवक्ते जुआन जोस मार्टिनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यात असलेल्या नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. एका अज्ञात हल्लेखोराने अचानक अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे नाईटक्लबमध्ये एकच गोंधळ उडाला होता. गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.