मुक्ता दिसणार धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
   दिनांक :10-Mar-2019
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वेचा 'मुंबई-पुणे-मुंबई ३' चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ती कोणत्या चित्रपटात काम करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. अखेर त्यांची ही उत्सुकता संपली आहे. ती 'बंदिशाळा' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 
मुक्ता 'बंदिशाळा' चित्रपटात एका धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच मुक्ताने महिला दिनाचे औचित्य साधत सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये ती पोलिसाच्या वेशात गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे. तिला डॅशिंग अंदाजात पाहणे कमालीचे ठरणार आहे. चित्रपटाचे शीर्षक व मुक्ताचा लूक पाहिल्यानंतर हा चित्रपट कारागृहावर आधारीत असेल असे वाटते आहे. हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.