आचारसंहितेमुळे महापौर दुचाकीवर स्वार..
   दिनांक :10-Mar-2019
 
 
 
 नागपूर : आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीला सरकारी गाडीचा वापर करता येत नाही. असे केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरतो, त्यामुळे सरकारी गाडी कार्यालयात जमा करावी लागते. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनीसुद्धा आपली सरकारी गाडी कार्यालयात जमा केली व आपल्या खाजगी दुचाकीने घरी गेल्या. नागपूर मतदार संघात ११ एप्रिलला पहिल्या टप्यात मतदान होणार आहे.