पाकिस्तानने भारताविरोधात 'एफएटीएफ'ला लिहले पत्र
   दिनांक :10-Mar-2019
 बालकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानवर आतंरराष्ट्रीय दबाव आणला होता. त्यामुळे पाकिस्तानाची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानने फ्रान्समध्ये असणाऱ्या फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सला (एफएटीएफ) भारताविरोधात पत्र लिहले आहे. 'पाकिस्तानप्रति भारताची द्वेष भावना जगाला माहित आहे. नुकतेच भारताने पाकिस्तानच्या हवाई सिमेचे उल्लघंन केले आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानवर बॉम्ब टाकत भारताने शत्रुता उत्पन्न केल्याचे एक उदाहरण आहे', असे उमरने पत्रात लिहले आहे . एशिया-पॅसिपिक जॉईंट ग्रुपच्या सहअध्यक्षपदावरून भारताला काढून टाकण्याची मागणी या पत्रात केली आहे.
 
 
पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी फ्रान्समध्ये असणाऱ्या फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सचे (एफएटीएफ) अध्यक्ष मार्शल बिलिंगसलीआ यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी भारताशिवाय इतर कोणत्याही आशियाई देशाला एशिया-पॅसिपिक जॉईंट ग्रुपच्या सहअध्यक्षपदावर नियुक्त करावे अशी विनंती केली आहे. जेणेकरून एफटीआयची कारवाई निष्पक्ष, पारदर्शी आणि वस्तूनिष्ठ होईल.