तेल्हाऱ्यात एकाची जाळून हत्या
   दिनांक :10-Mar-2019
तेल्हारा: शहरातील ५० वर्षीय रमेश ओंकार हागे यांचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आज सकाळी त्यांच्या घरासमोर आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अनेक तर्क केले जात आहेत. मात्र, हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. तेल्हाराच्या संभाजी चौक येथील रहिवासी रमेश ओंकार हागे हे आपल्या कामाकरीता शेतात गेले होते. रात्रीउशीरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला.मात्र, आज पहाटे रमेश हागे यांचा जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह त्यांच्या घराजवळच आढळून आला. अत्यंत क्रूरपणे हागे यांची हत्या करण्यात आल्याचे दृश्य पुराव्यावरून दिसते.
 

 
 
घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून पुढील तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रमेश हागे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. रमेश हागे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.