आयुषमानचा ‘अंधाधून’ चीनमध्ये होणार प्रदर्शित
   दिनांक :11-Mar-2019
मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘अंधाधून’ हा लवकरच चीनमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. चित्रपट आयुषमान खुराणा मुख्य भूमिकेत दिसला असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. 
 
 
आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती व्हायाकॉम १८ ने ट्विटरवर दिली आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा व्हायाकॉम १८ स्टुडिओचा आणि आयुषमानचाही पहिलाच चित्रपट आहे. अंधाधून ‘पियानो प्लेअर’ नावाने प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये गेल्या वर्षभरापासून भारतीय चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसून येत आहे. यापूर्वी आमिर खानच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग चीनमध्ये होता. आमिरचे चित्रपट भारतापेक्षाही चीनमध्ये सर्वाधिक कामाई करायचे आता इतरही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘बजरंगी भाईजान’, ‘हिचकी’, ‘हिंदी मिडीयम’ यांसारखे चित्रपट वर्षभरात चीनमध्ये प्रदर्शित झाले या चित्रपटांना चांगली पसंती लाभली.
 
 
‘अंधाधून’बरोबर श्रीदेवीचा  ‘मॉम’ हा चित्रपटदेखील चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. या दोन्ही चित्रपटांना चीनमध्ये कसा प्रतिसाद मिळतो हे आता पाहण्यासारखे ठरेल .