जुळलेले लग्न तोडून तरुणीचा विनयभंग
   दिनांक :11-Mar-2019
नागपूर: जुळलेले लग्न तोडून एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी कोराडी पोलिसांनी २६ वर्षीय अनमोल सुरेश मेहर रा. बेसा यास अटक केली. पीडित तरुणी ही धंतोली परिसरात राहते. ती आणि आरोपी अनमोल हे कोराडी येथील महाविद्यालयात शिकतात. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीने त्याला लग्नाची गळ घातली असता तो टाळाटाळ करू लागला. त्यामुळे तिचे दुसèया तरुणासोबत लग्न जुळले. ही माहिती अनमोलला होताच त्याने तरुणीच्या भावी पतीला त्याच्या प्रेमसंबंधाची माहिती देऊन लग्न तोडले. त्यामुळे तरुणी संतप्त झाली आणि त्याने अनमोलसोबत असलेले संबंध तोडून टाकले. तरीही अनमोल हा रस्त्याने तिचा पाठलाग करून तिला अडवायचा, तिच्याशी बळजबरी करायचा. त्यामुळे तरुणी त्रस्त झाली होती. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अनमोलला अटक केली.