आजचे राशी भविष्य, दि. ११ मार्च २०१९
   दिनांक :11-Mar-2019
मेष- मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
 
वृषभ - व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
 
मिथुन - आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
 
कर्क - वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नविन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल.
 
सिंह - कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावा.
 
कन्या - धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
 
तूळ - मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावे. 
 
वृश्चिक - व्यावसायात अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
 
धनु - प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
 
मकर - अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे.
 
कुंभ - सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
 
मीन - मुलांकडून फार अपेक्षा ठेवू नये. शुल्लक कारणावरून वादविवाद टाळावा. झालेल्या चुकांचा पश्चताप करण्यापेक्षा आपल्या सवयीत बदल करावा.