गीतांजली एक्स्प्रेसच्या डब्याला आग
   दिनांक :11-Mar-2019
जळगाव 
 जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. जळगावजवळ सोमवारी (११ मार्च) दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
 
गीतांजली एक्स्प्रेस शिरसोली रेल्वे स्थानकातून जात असताना शेवटच्या डब्याला आग लागली असल्याचे शिरसोली येथील गेटमनच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. यानंतर शिरसोलीपासून काही अंतरावर ही गाडी थांबविण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करुन आग विझविण्यात आली आहे. यानंतर आगग्रस्त डबा वेगळा करुन गाडी जळगावकडे रवाना करण्यात आली.