ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड
   दिनांक :11-Mar-2019
नवी दिल्ली:
 भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आला आहे. ज्यावेळी एअरस्ट्राइक झाली तेव्हा मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या संघटनेचा तळ असलेल्या बालाकोटमधील जाबा टॉप येथे २६३ दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती समोर आली आहे.
 
 
एका वृत्तवाहिनी या संदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकपूर्वी जाबा टॉप येथे २६३ दहशतवादी जमलेले होते, अशी माहिती आपल्याला मिळाल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला आहे. तसेच बालाकोट येथे असलेल्या शिकाऊ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जैश ए मोहम्मदचे १८ टॉप कमांडरही तिथे उपस्थित होते, असेही या वृत्तात म्हटले आहे. बालाकोटमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांपैकी ८३ दहशतवादी हे दौरा-ए-आम मधील होते. तर ९१ दहशतवादी हे दौरा-ए-खास या गटातील होते. तर २५ दहशतवाद्यांना फिदायीन हल्ल्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत होते.