इथोपिया विमान अपघात; मृतांमध्ये ६ भारतीयांचा समावेश
   दिनांक :11-Mar-2019
इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणाऱ्या इथोपिअन एअरलाइन्सचे विमानाने उड्डाण घेताच ६ मिनिटांच्या आत अपघाग्रस्त झाले . या अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या ४ वरुन ६ इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आले.

 
 विमान अपघातात सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका भारतीय कुटुंबातील ६ जणांचा समावेश आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन याची माहिती दिली.
 दुर्घटनेतील मृतांची नावे स्वराज यांनी प्रसिद्ध केली असून यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबियांना सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश इथोपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत.
स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबियांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, मी वैद्य यांच्या टोरंटोतील मुलाशी फोनवरुन चर्चा केली. मात्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील ६ व्यक्तींना गमावल्याचे कळताच आपल्याला खूपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इथिओपिया आणि केनयातील भारतीय दुतावासाशी संवाद साधत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितले आहे.