दारूच्या तस्करीसाठी विक्रेत्यांची नवी शक्कल
   दिनांक :11-Mar-2019
 
 
मूल : चंद्रपूर जिल्हात दारु बंदी असतांना पोलीसांची नजर चुकवुन दारु विक्री करीत असलेल्या अनेकांवर अवैद्य दारु विक्रीचे गुन्हे दाखल होत असतांनाही अवैद्य दारु विक्रेत्यानी नवनव्या शक्कल लढवत अवैद्य दारु विक्री सुरुच ठेवली आहे. अनेक गावात आजही दारु मिळत असल्याने दारुबंदीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अवैद्य दारु विक्रीवर करडी नजर ठेवुन पोलिस प्रशासन काही प्रमाणात अंकुश लावण्याचा प्रयत्न करित असली अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या लालसेने तरुणांसह अनेक महीला अवैद्य दारु विक्री करीता सक्रिय आहेत. नव-नव्या युक्त्या लढवत पोलीसांच्या डोळ्यात धुळ झोकुन दारु विक्री करीतच आहेत. परिणामी दारुबंदीसाठी सक्रीय असलेल्या पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे.
 


 
पोट भरण्यासाठी खेडोपाडी फिरुन लहान व्यवसायी आपले व्यवसाय करतात. लग्नसराईची चाहुल लागत असल्याने मूल तालुक्यातील बेंबाळ येथे मोटार सायकलनी गावात फिरुन भांडे विक्री करणारे दोन युवक भांड्यात दारु साठवून दारु विक्री करीत असल्याचा प्रकार जागरुक नागरिकांच्या लक्षात आला. सदर प्रकाराची माहीती त्यांनी बेंबाळ पोलिस स्थानकाचे हेकाँ. प्रकाश हुलके यांना दिली. तेव्हा त्यांनी सापळा रचुन त्यांचेवर पाळत ठेवली, भांडे विकण्याचा बहाण्याने गांवात फिरत असतांना त्यांच्या साहीत्याची तपासनी केली असता,त्यांच्याकडे तब्बल ८५ हजाराची देशी दारू आढळली. पोलिसांनी या प्रकरणी  आरोपी संदिप वामन मेटपल्लीवार आणि भोलेनाथ बसेश्वर मेटपल्लीवार यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनात प्रकाश हुलके, एस. आय. संगमवार, आनंदराव तितिरमारे, देविदास वेलादी आदिंनी केली. पुढील तपास पो.उ.नि.चंद्रभान शेन्डे करीत आहेत.