लवकरच येणार मदर तेरेसांचा बायोपिक
   दिनांक :11-Mar-2019
बॉलिवूडमध्ये ‘बायोपिक’ चा ट्रेंड सुरु आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असून कलाकार, भारतीय खेळाडू तसेच राजकीय नेते किंवा इतिहासातील पात्रांवर आजपर्यंत अनेक चित्रपट आपलायला पाहायला मिळाले. आता नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक बनविण्यात येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सीमा उपाध्यय करणार असून बॉलिवूड तसेच हॉलिवूडचे स्टार या चित्रपटात झळकणार आहेत. प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर आणि प्राची मनमोहन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
 
 
चित्रपट निर्मात्यांनी मदर तेरेसा यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी सध्याच्या मिशनरी ऑफ चॅरिटी सुपीरियर जनरलच्या सिस्टर प्रीमा मेरी पियिक यांची भेट घेतली. तसेच कोलकात्ता येथील सिस्टर लीन यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या. ‘आम्ही कोलकातामधील मिशनरी ऑफ चॅरिटीला भेट दिली आणि तो अनुभव आमच्यासाठी खास होता’ असे उपाध्यय यांनी म्हटले. मदर तेरेसा यांच्या सेवाभावी कार्यावर चित्रपट बनवताना निर्मात्यांना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मदर तेरेसा: द संत’ हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाव्दारे मदर तेरेसा यांनी केलेल्या कामाचे अनेक पैलू लोकांसमोर उघड होणार आहे.