भरधाव ट्रकने पादचाऱ्यास चिरडले
   दिनांक :11-Mar-2019
 
मालेगाव : येथील नागरतास वळण मार्गावर टी पॉईन्ट जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने एका पादचाऱ्यास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहिती नुसार, दुपारी १ वाजताच्या सुमारास मृतक संजय तोडी यादव हॉटेल मधुन चहा पिऊन रस्ता ओलांडत होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्यांचा ट्रक उभा होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्र . एच आर ५५ वाय २८१२ ट्रकने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी होशीयारपुर पंजाब येथील ट्रक चालक दलजीत सिंग स्वर्ण सिंग लोभाणे याला अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे कॉ कोकाटे करीत आहेत .