राज्यात प्रथमच होणार व्हीव्हीपॅट
   दिनांक :11-Mar-2019
मुंबई,
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील ८ कोटी ७ लाख ९८ हजार मतदार चार टप्प्यांत आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यंदा प्रथमच राज्यात व्हीव्हीपॅट मतदारयंत्रांचा वापर होईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आश्निनीकुमार यांनी दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघांत ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यात दहा मतदारसंघांत १८ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यात १४ मतदारसंघांमध्ये २३ एप्रिलला तर चौथ्या टप्प्यात १७ लोकसभा मतदारसंघांत २९ एप्रिल रोजी मतदान होईल. मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्यापही सुरूच असून, उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या दहा दिवसांपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार दिला जाईल, अशी माहिती अश्विनीकुमार यांनी दिली. 'मतदारांना सर्व प्रकारची माहिती तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३१ जानेवारी, २०१९ रोजी प्रकाशित यादीतील सर्व मतदार मतदानासाठी पात्र असतील', असेही त्यानी सांगितले.