बकूळ धवनेलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्य पदक
   दिनांक :12-Mar-2019
चंद्रपूर,
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित ५८ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नवोदिता चंद्रपूर या संस्थेने सादर केलेल्या ‘नथिंग टू से’ या नाटकातील मालविका या भुमिकेसाठी बकूळ धवने हिला सर्वोकृष्ट स्त्री अभिनयाचे रौप्य पदक जाहीर झाले आहे.
 
 
 
५८ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी मिरज-सांगली या केंद्रावर पार पडली. या स्पर्धेचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. नवोदिता चंद्रपूरच्या प्रसाद दाणी लिखीत डॉ. जयश्री कापसे-गावंडे दिग्दर्शीत ‘नथिंग टू से’ या नाटकातील भुमिकेसाठी बकूळ धवने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य पदकाची मानकरी ठरली आहे.
 
नथिंग टू से हे नाटक नुकतेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे आयोजित कामगार राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यातून प्रथम येत सहा पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. या नाटकाच्या दिग्दर्शक डॉ. जयश्री कापसे-गावंडे असून, निर्माते अजय धवने व आशिष अंबाडे आहेत. प्रकाशयोजना हेमंत गुहे यांची असून, नेपथ्य पंकज नवघरे व तेजराज चिकटवार यांचे आहे. संगीत अंकुश राजुरकर यांचे असून, रंगभुषा व वेशभुषेची जवाबदारी नूतन धवने यांनी सांभाळली आहे. या नाटकात जयंत वंजारी, राजेंद्र तुपे आणि बकूळ धवने यांच्या प्रमुख भुमिका आहेत. नवोदिताच्या व बकूळ धवने यांच्या यशाबाबत येथील सांस्कृतिक वर्तुळात अभिनंदन करण्यात येत आहे.