आजचे राशी भविष्य, दि. १२ मार्च २०१९
   दिनांक :12-Mar-2019
मेष : संधी तुमच्या दाराशी चालून येईल. अत्यंत कौशल्याने तिचे सोने करा. परक्यांवर विश्वास ठेवू नका. सूर्योपासनेला आरंभ करा.
 
वृषभ : स्पर्धेला सामोरे जावेच लागणार आहे. अधिक परिश्रम करावे लागतील. नात्यातल्या गुंत्यात अडकाल. विठ्ठलाचे दर्शन घ्या.
 
 मिथुन : दुचाकी वाहनाची खरेदी कराल. आर्थिक गुंवणूक करताना सावध रहा. व्यवहार चोख ठेवा. दिवस आनंदात जाण्यासाठी नामस्मरण करा. 
 
कर्क : देवधर्माच्या कार्यात दिवस जाईल. दगदग होईल, पण नव्या ओळखी लाभदायक आहेत. आराध्य देवतेचे स्मरण करा. 
 
सिंह : आज आवश्यक असलेले काम आजच करा. चालढकल करू नका. कुणी फार जवळीक साधण्याचा प्रयत्न करील. मारोतीची उपासना करा.
 
कन्या :  स्त्रीमोहात अडकू नका. कुणी प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न करेल. गुलाबी रंग आजच्यासाठी लाभदायक आहे. 
 
तूळ : व्यवसायात अडचणीचा आजचा दिवस आहे. अकारण कुणावर संशय घेऊ नका. भांडणाचे प्रसंग येतील. पूजेनेच शांतता मिळेल.
 
वृश्चिक :  घरांतील मोठ्या व्यक्ती अचाक तुमची पाठराखण करतील. गैरसमज दूर होतील. तंटू नका. औदूंबराजवळ साखर ठेवा.
 
धनू : नव्या विचारांचा सामना करावा लागेल. वाद घालूनही अखेर तुम्हाला नवे ते मान्य करावे लागेल. शब्दच्छल करू नका. पूजार्‍याला दान करा.
 
मकर : नोकरीत असाल तर तिथल्या सगळ्या समस्या सुटतील. साहेब जरा विक्षिप्त आहे, हे सर्वांनाच मान्य असले तरीही तुम्ही ते बोलू नका. घरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर काढा. 
 
कुंभ : मन उत्साहित करणार्‍या घटना घडतील. हातता पैसा खेळेल. वेळेचा अपव्यय टाळा. कुणाच्या फंदात पडू नका.
 
मीन : अपरिचित व्यक्ती घरी येतील. तुमच्याशी व्यवहार करू पाहतील. नीट चौकशी केल्यावरच काय ते ठरवा. तोटा होणार नाही. सायंकाळी देवदर्शनाला जा.