'वॉर्नर' ठरेल 'मॅन ऑफ द सिरिज'- शेन वॉर्न
   दिनांक :12-Mar-2019
 
 
सध्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया सामोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननेही विश्वचषक स्पर्धेबाबत भविष्यवाणी केली आहे. 
माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरबाबत बोलताना शेन वॉर्नने सांगितले, की ते दोन्ही मोठे खेळाडू असून या विश्वचषक स्पर्धेत ते शानदार पुनरागमन करतील, आणि ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देतील. तसेच डेव्हिड वॉर्नर हा आगामी विश्वचषक स्पर्धेत धमाकेदार खेळी करून 'मॅन ऑफ द सिरीज'चा मान पटकावेल, असेही वॉर्न म्हणाला. वॉर्नर सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.