रमजानला निवडणुकीशी जोडणे अर्थहिन : जावेद अख्तर
   दिनांक :12-Mar-2019
मुंबई,
आगामी लोकसभा निवडणुका रमजान महिन्यात येत असल्यामुळे सुरू असलेल्या चर्चेला जेष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त करीत या चर्चेला कोणताही अर्थ नसून निवडणुक आयोगाने याबाबत विचार करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काही लोकांनी यावर आक्षेप घेतला होता. रमजानच्या काळात निवडणुका होत असल्यामुळे मुस्लीम समाजाला त्रास होऊ शकतो असे या लोकांचे म्हणणे होते.

अख्तर यांनी ट्विटरवरून  या प्रकरणाचा समाचार घेत लिहिले आहे की, निवडणुका आणि रमजानशी संबंधित चालेल्या चर्चेला मी अर्थहिन समजतो. हे धर्मनिरपेक्षतेचे विकृत रुप असून जे माझ्यासाठी अर्थहिन, बिभत्स आणि सहन न होणारे आहे. निवडणुक आयोगाला यावर बिल्कुल विचार करण्याची गरज नाही.
 
 
 
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि तृणमुल काँग्रेसचे नेता व कोलकाता शहराचे महापौर फिरहाद हकीम यांनी सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुक कार्यक्रमांवर प्रश्न उपस्थित केले होते.