जवानांचे प्राण वाचवणार 'डीआरडीओ'चे औषध
   दिनांक :12-Mar-2019
गंभीर जखमी जवानांपैकी ९० टक्के जवान काही तासांतच प्राण सोडतात. हीच बाब लक्षात घेऊन जीवितहानी कमी करण्यासाठी डीफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननं (DRDO) 'कॉम्बॅट कॅज्युअलिटी ड्रग्ज' तयार केलं आहे. हे औषध जखमी जवानांसाठी 'संजीवनी' ठरणार आहे. या औषधामुळं जखमी जवानांचे प्राण वाचू शकतात.
 
 
या औषधांमध्ये रक्तस्राव होणारी जखम भरणे, ड्रेसिंग आणि ग्लिसरेटेड सलाइनचा समावेश आहे. जखमी झालेल्या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीचा कालावधी खूपच महत्वाचा असतो. तो वाढवण्याचं काम हे औषध करतं. त्यामुळं जवानांचे प्राण वाचू शकतात, असं डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
या औषधांमुळं जवानांचे प्राण वाचू शकतात. जीवितहानीही कमी होऊ शकते. जखमी झाल्यानंतर आणि रुग्णालयात नेण्याआधी त्याला उत्तम प्राथमिक उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं. डीआरडीओनं तयार केलेले औषध युद्धकाळात लष्कराच्या जवानांसाठी वरदान ठरेल, असं डीआरडीओच्या लाइफ सायन्सेसचे महासंचालक डॉ. ए. के. सिंह यांनी सांगितलं.