वाशिममध्ये बॉम्ब शोधक पथक सक्रिय
   दिनांक :12-Mar-2019
 
वाशीम : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाशिममध्ये सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे. या अनुषंगाने शहरातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तपासणी केली. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून  बसस्थानक, पाटणी मार्केट, शिवाजी चौक, बालाजी मंदिर इत्यादी ठिकाणी तपासणी करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अपर पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या आदेशानुसार तपासणी करण्यात आली. यापुढेही शहरात नियमित घातपात विरोधी पथकाद्वारे तपासणी केली जाणार आहे.