गडकरींविरोधात नाना पटोले नागपूरमधून लढणार; काँग्रेसची २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
   दिनांक :13-Mar-2019
नवी दिल्ली, 
लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातून पाच जागांवरील उमेदवार या दुसऱ्या यादीतून जाहीर करण्यात आले आहेत. तर उर्वरित १६ जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. या यादीत नागपुरातून विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपासोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या साध्वी सावित्रीबाई फुले यांना उत्तर प्रदेशातील बहारिच येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
 
काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई साऊथमधून मिलींद देवरा, गडचिरोली-चिमुर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
 
 
तर, उर्वरित १६ जागा या उत्तर प्रदेशातील आहेत. या दुसऱ्या यादीत खुल्या प्रवर्गातील १२ उमेदवार आहेत. तर अनुसुचित जाती प्रवर्गातील ८ उमेदवार आहेत तर १ उमेदवार अनुसुचीत जमाती प्रवर्गातील आहे.