नक्षलांकडुन वाहनांची जाळपोळ
   दिनांक :13-Mar-2019
गडचिरोली,
एटापल्ली, तालुक्यापासुन जवळपास २५ किमी अंतरावर असलेल्या पुस्के येथे १२ मार्च रोजी मध्यरात्री नक्षलांनी चार जानडीअर वाहने जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. सदर गावात मागील काही दिवसापासुन रस्त्याचे बांधकाम सुरु होते. तसेच दोन दिवसापूर्वी याच गावात एका रोडरोलर ला सुद्धा जाळण्याचा प्रयत्न केला गेला.
 

 
 
प्राप्त माहितीनुसार काल मध्य रात्री १२ ते १५ नक्षली गावात दाखल झाले व सुरु असलेल्या कामाचा विरोध करत त्यांना कामावर लागलेल्या ४ वाहनांची जाळपोळ केली. सदर बांधकामाचे कंत्राटदार अहेरी येथील सतीश मुक्कावार असल्याची माहिती मिळाली असुन नक्षलांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागात त्यांची चांगलीच भीती निर्माण झाली आहे.