आजचे राशी भविष्य, दि. १३ मार्च २०१९
   दिनांक :13-Mar-2019
 
मेष :  सरकारदप्तरी असणारी कामे मार्गी लागतील. स्वतःचाच दुराग्रह चालू ठेवणे अहितकारक राहील. आर्थिकदृष्ट्या दिवस फार मोठ्या उलाढालीचा नसला तरी उधारी-वसुली व रोखीचे व्यवहार यातून आपणास अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्य होईल.
 
वृषभ:   दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. आपल्या प्रवासाद्वारे अर्थप्राप्तीचे योग येतील. पत्रव्यवहाराद्वारे अपेक्षित गोष्टींना चालना मिळेल. आपल्या हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. घरातील ज्येष्ठांशी होणारे मतभेद व गैरसमज वाढण्याची शक्यता असल्याने याबाबत अधिक दक्ष राहा.
 
मिथुन :  नव्या गोष्टी शिकायला मिळाल्याने आपल्या अंगी असलेल्या कौशल्यात भर पडेल. नोकरीत स्वतःचा दबदबा निर्माण करण्याची संधी आपणास मिळेल. नव्या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष द्या.
 
कर्क : दिवस महत्त्वाचा असणार आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींशी परिचय, नव्या गोष्टींचा परिचय या सगळ्या गोष्टींचा मेळ जमून चांगल्या वार्ता ऐकण्यास मिळतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. नव्या व्यक्तींच्या परिचयांचा लाभ घेता येईल   
 
सिंह :  वैवाहिक जीवनात काही चुकीच्या शब्दातून वादाच्या प्रसंगाचे वारे वाहू शकतात, तेव्हा सावध राहा. सरळमार्गी माघार घेणेच अशा वेळी योग्य ठरते. योग्य व्यक्तींनाच मदत करा, विनाकारण सर्वांना मदतीचा हात पुढे करू नका. राजकीय क्षेत्रात एखादे कार्य अंगावर पडण्याची शक्यता आहे.
 
कन्या : व्यापारात येणाऱ्या संधीचा लाभ घेतल्याने अपेक्षित नफा मिळविता येईल. प्रवासाचे योग संभवतात. नव्या क्षेत्रांचा व व्यक्तींचा परिचय होईल व त्याचा लाभ घेता येईल. प्रवास योग संभवतात. नोकरी-व्यवसायात मिळणाऱ्या संधीचा योग्य उपयोग करून आपला लाभ करून घेता येईल. वैवाहिक जीवनात काही तात्पुरते मतभेद होतील, तेव्हा सावध राहा. कुटुंबातील काही जटील प्रश्न लांबणीवरच टाकणे योग्य ठरेल.
 
तूळ : ज्येष्ठांच्या सल्ल्याने काही मोठे व्यवहार मार्गी लावता येतील. आपल्या गोड बोलण्याने आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपण आपले उद्दिष्ट गाठू शकाल.  
 
वृश्चिक : आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहा व नियमित औषधपाणी घ्या. कुठल्याही गोष्टींचा फक्त विचार न करता प्रयत्न व कृतीला प्राधान्य द्या.
 
कुंभ : आपले श्रम वाढवा, प्रयत्नशील राहा. आर्थिक बाबतीत जे मिळणार आहे ते पदरात पाडून घ्या. प्रवास योग संभवतात. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल.
 
मीन : आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. एकंदरीत पाहता वैवाहिक जीवनात आनंददायी प्रसंगाने मानसिक समाधानाचे क्षण येतील. कामात झोकून देण्याचा मार्ग अधिक सुखकर व यशदायी ठरेल. संततीच्या बाबतीत काही शुभसंकेत व शुभवार्ता ऐकण्यास मिळतील.