अझहरमुळे प्रदेशाची शांतता धोक्यात, अमेरिकेचा चीनला संदेश
   दिनांक :13-Mar-2019
पुलवामा हल्ल्यामागे असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला आणखी विलंब झाला तर ते प्रदेशासाठी चांगले ठरणार नाही असे अमेरिकेने चीनला सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी जे पाऊल उचलले आहे ते फसले तर प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या दृष्टीने ते चांगले ठरणार नाही याची अमेरिकेने चीनला कल्पना दिली आहे.
 
 
अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनने जो प्रस्ताव सादर केला आहे त्यावर आक्षेप घेण्यासाठी असलेली दहा दिवसांची मुदत बुधवारी संपणार आहे. भारत-पाकिस्तानमध्ये शांतता राहणे चीन आणि अमेरिका दोघांच्या हिताचे आहे. कारण मसूद अझहरवर निर्बंध टाकले नाही तर त्यामुळे प्रदेशाची शांतता धोक्यात येईल.
आता सर्व काही चीनच्या भूमिकेवर अवलंबून आहे. याआधी अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यामध्ये चीनने आपल्या अधिकाराचा वापर करुन खोडा घातला आहे. मसूद अझहरच्या जैशने भारतात संसदेवरील हल्ला, पठाणकोट हवाई दलाच्या तळावरील हल्ला, उरी सारखे अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.