'आंखें- २' मध्ये दिसणार जॅकलिन फर्नांडिस ?
   दिनांक :13-Mar-2019
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा, नाट्यमय घडामोडी आणि उत्तम अभिनयामुळे 'आंखे' चित्रपट हिट ठरला. याच चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येत आहे. 'आंखे २' मध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
 
 
 
'आंखे २' मध्ये पाच मोठे कलाकार दिसणार असून त्यात अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. इतर स्टार्सची नावंही लवकरच समोर येतील. 'आंखे' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते परेश रावल यांनादेखील 'आंखे २' मधील भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे.
 
या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिस बझ्मी सध्या दुसऱ्या चित्रपटाच्या कामात व्यस्त असल्यामुळे काही गोष्टी अद्याप पूर्ण व्हायच्या आहेत. सध्या ते लंडनमध्ये आगामी 'पागलपंती' सिनेमाचे चित्रीकरण करत आहेत. त्यानंतर 'आंखे २'च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.